top of page
नमस्कार,
सध्याच्या युगात आपण सर्वजण वाटसरू आहोत असे नाही वाटत तुम्हाला? जसा वाटसरू आपली वाट शोधायचा प्रयत्न करत असतो, तसेच आपण सतत काही ना काही शोधत असतो. नोकरी... ती मिळाली की बढती... पैसा मिळवण्याची नवीन वाट ..... अश्या अनेक गोष्टी... पण, या सर्व शोधा-शोधी मध्ये निखळ आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आहे काय?
त्याच प्रमाणे, रोजच्या आयुष्यात काही प्रश्न आपल्याला पडत असतात पण आपल्या धावपळीत सगळे अनुत्तरित राहून जातात. तसेच, अनेक गोष्टींची माहिती आपल्याला घ्यावीशी वाटते पण ते शक्य होत नाही.
अनेक कथा, कविता, आपल्या इतिहासातील काही गोष्टी..... आणि बरेच काही आहे जे वाचण्याजोगे आहे पण आज ते विस्मृतीत गेले आहे. अश्याच काही गोष्टींचा संग्रह करण्याचा हा छोटासा प्रयत्न...
आपला नम्र,
देवेंद्र रघुनाथ परब
bottom of page