देवाचे देवपण
(देवेंद्र रघुनाथ परब)
देवाचे देवपण, सामर्थ्य त्याचे मोठेपणं आजकाल फक्तं त्याच्या मंदिरांच्या भव्यतेवर आणि त्याच्या वास्तव्यच्या ठिकाणावर अवलंबून आहे. कारण, ज़र असं नसतं, फक्त सिद्धिविनायक, मुंबादेवी, वैष्णवदेवी, तिरूपती, शिर्डीचे साईंबाबा, लालबागचा राजा ...... हीच देवस्थान जागृत व फक्त नवसाला पावणारी नसती.
आणि घरातील गणपती, पारावरचा हनुमान फक्त दिखाव्या पुरते राहीले नसते.
जरा विचित्र पण सत्य आहे ........... पण जरा विचार केला तर तुम्हालाही पटेल.
कारण, ठरावीक देवस्थानांना जाताना आपण हार-तुरे, पेढ्यांचा प्रसाद आणि काय नी काय.....
पण घरातील देवाला ??? १ अगरबत्तीचा पुडा तोपण ३० काड्या मोजुन, १० रूपयांचं तेलं (कारणं १५ दिवस तरी चालला पाहिजे ना).....
देवस्थानांतील देवांना रोज दुधाचा अभिषेक..... त्यात रोजच्या स्वच्छतेत ज़र हरगर्जीपणा झाला तर आपण पुजारी लोकांना दूषणे देतो......
अहो पण घरातील देवांचे काय ????
संकष्ठी.... एकादशीला पाण्याने आंघोळ...... आणि स्वच्छता ??? ज़रा स्वत:च्या घरातील देवा-याच्या वरच्या बाजुला वाकून बघा .... जळमटं मिळतील....
अशी अजुन कितीतरी उदाहरणे आहेत..... पणं तुर्तास पुरे.....विचार करा........