top of page
कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...
(संग्रहीत...)
कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी;
तडकलेच जर हृदय कधी,
तर जोडताना असह्य यातना व्हावी;
डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये,
की पानांना ते नाव जड व्हावे;
अचानक एक दिवस त्या नावाचे,
डायरित येणे बंद व्हावे;
स्वप्नात कुणाला असेही बघू नये,
की अंधारतही त्याचे हात असावे;
तुटलेच जर स्वप्न कधी,
तर आपल्या हातात काही नसावे,
कुणालाही इतका वेळ देऊ नये,
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा;
एक दिवस आरशात आपणास,
आपलाच चेहरा परका व्हावा;
कुणाचे इतकेही एकू नये,
की आपल्या कानात त्याच्याच शब्दांचा घूमजाव व्हावा;
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून,
त्याच शब्दांचा उच्चार व्हावा;
पण.........
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये,
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे;
दूरदूर आवाज दिला तरी,
आपले शब्द जागीच घुमावेत.....
bottom of page