top of page

ध्येय

(संग्रहीत...)

असतात जीवनात ढग काळे पांढरे,
असतात अनुभव उंच-खोल पहाड द-यांसारखे;
पण देते धडा वाहणारी प्रवाहमय नदी,
आणि उंच उंच आकाशात उडणारे पक्षी;
असते काळ्या ढगातहि वीज चमकमणारी,
ढग असो, सोसाट्याचा वारा असो, मारू भरारी;

संकटातून मार्ग काढताना धरावे धैर्य,
स्थिर विवेकाने गाठावे मग आपले ध्येय.

चांगले मित्र

(संग्रहीत...)

चांगले मित्र हे नेहमी वाईट भाडेकरू असतात;

ते आपल्या मनात रहातात,

छदामभर भाड देत नाहीत;

हवे तेव्हा घरही खाली करत नाहीत,

आणि कधी बाहेर पडलेच तर,

घरची मोडतोड करूनच बाहेर पडतात!

© 2023 by NOMAD ON THE ROAD. Proudly created with Wix.com

  • b-facebook
  • Twitter Round
  • Instagram Black Round
bottom of page